07 March 2021

News Flash

पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब पुन्हा व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर थांबणार नाही हसू

या व्हिडीओतही चाँद नवाब पुन्हा एकदा पीटीसी करताना आपली वाक्यं विसरलेले दिसत आहेत

पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाबला ओळखत नसेल अशी व्यक्ती मिळणं जरा कठीणच आहे. काही वर्षांपुर्वी ईदच्या दिवशी पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाबचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या अतरंगी रिपोर्टिंगमुळे चर्चेत आलेले चाँद नवाब इतके प्रसिद्ध झाले की, बॉलिवूडनेही त्यांची दखल घेतली होती. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने चाँद नवाब यांची भूमिका साकारली होती. आता हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, पुन्हा एकदा चाँद नवाब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाहीत.

या व्हिडीओतही चाँद नवाब पुन्हा एकदा पीटीसी करताना आपली वाक्यं विसरलेले दिसत आहेत. आपल्या या विसरण्याच्या सवईमुळे त्यांना सारखे रिटेक घ्यावे लागत आहेत.

गेल्यावेळी चाँद नवाब ईदच्या निमित्ताने रेल्वे स्थानकावर उभे राहून घरी जाणाऱ्या प्रवाशांबद्दल रिपोर्टिंग करत होते. त्यावेळी त्यांनी केलेली रिपोर्टिंग प्रचंड व्हायरल झाली होती. बँकग्राऊंडला ट्रेन हवी असल्या कारणाने घाईत असणारे चाँद नवाब सारखं विसरत आहेत, आणि जेव्हा आठवतं तेव्हा लोक मधून जात असल्याने ते वैतागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:43 pm

Web Title: pakistani journalist chand nawab video viral
Next Stories
1 चांदीच्या वस्तऱ्याने ‘तो’ करतो जवानांची नि:शूल्क दाढी
2 ब्लॅक बॉक्स म्हणजे काय माहितीये?
3 सौदीतील महिला पत्रकारावर वार्तांकनाच्यावेळी अंगप्रर्दशन केल्याचा आरोप, कारवाईची मागणी
Just Now!
X