नवी दिल्ली : समकालीन मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. मराठीसह २३ भाषांतील साहित्य पुरस्कारांची बुधवारी अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी घोषणा केली. एक लाख रुपयांच्या या पुरस्काराचे २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे.

इंग्रजीमध्ये शशी थरूर यांच्या ‘एरा

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

ऑफ डार्कनेस’ (कथेतर गद्य) पुस्तकाचीही साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कोंकणीमध्ये नीलबा खांडेकर यांच्या ‘द वर्ड्स’ या कवितासंग्रहालाही पुरस्काराने नावाजण्यात आले. सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना २०१९चा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी साहित्यासाठी आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत हे तिघे परीक्षक होते. नेपाळी भाषेतील पुरस्कार जाहीर झालेला नाही.

साहित्यिक-साहित्य-भाषा

* कविता : फुकनचंद्र बसुमतारी (खाइ आथुमनिफ्राय-बोडो), नंदकिशोर आचार्य (छीलते हुए अपने को- हिंदी), कुमार मनीष अरविंद (जिनगीक ओरिआओन करैत- मैथिली), नीलबा खांडेकर (द वर्ड्स-कोंकणी), व्ही. मधुसुदनन नायर (अचन पिरन्ना वीदू- मल्याळम), अनुराधा पाटील (कदाचित अजूनही- मराठी), पेन्ना- मधुसुदन (प्रज्ञाचक्षुषम् -संस्कृत)

* कादंबरी : जयश्री महंत (चाणक्य- आसामी), बेरिल थंगा (ई अमादी अदुनगीगी ईठत- मणिपुरी), चो. धर्मन (सूल- तमिळ), बंदी नारायण स्वामी (सेप्ताभूमी- तेलुगु)

* कथा : अब्दुल अहद हाजिनी (अख याद अख कयामत- काश्मिरी), तरुण कांति मिश्र (भास्वती- ओडिया), किरपाल कजाक (अंतहिन-पंजाबी), रामस्वरूप किसान (बारीक बात- राजस्थानी), काली चरण हेम्ब्रम (सिसिरजली- संताली), ईश्वर मूरजाणी (जीजल- सिंधी)

* निबंध : चिन्मय गुहा (घुमेर दरजा थेले- बाड्ला), ओम शर्मा जद्रंयाडी (बंदरालता दर्पण- डोंगरी), रतिलाल बोरीसागर (मोजमा रें वुं रे!- गुजराती),

* कथेतर गद्य: शशी थरूर (अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस- इंग्रजी), शाफे किडवई (सवनेह ए सर सैयद- उर्दू- चरित्र), विजया (कुडी एसारू- कन्नड- आत्मचरित्र)