29 May 2020

News Flash

उत्तरप्रदेशात सूडापोटी मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशातील मिर्झा तिला खेडय़ात पाच जणांनी एका सोळा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. २५ ऑगस्टला एका कुटुंबातील मुलीवर बलात्कार झाला होता.

| September 3, 2014 12:51 pm

उत्तर प्रदेशातील मिर्झा तिला खेडय़ात पाच जणांनी एका सोळा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. २५ ऑगस्टला एका कुटुंबातील मुलीवर बलात्कार झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मुलीच्या तक्रारीनुसार गुलझार, शाहीद, गुड्डूस यांच्यासह पाच जणांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश जॉली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बलात्काराची घटना सोमवारी घडली असून, आरोपींनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मुलीच्या अल्पवयीन भावाने आम्हाला यात गुंतवले आहे, असा प्रत्यारोप त्यांनी केला आहे. सदर अल्पवयीन मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपी कुटुंबातील मुलीचे अपहरण करण्यात आले होते आणि या मुलीच्या भावाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २५ ऑगस्टला घडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 12:51 pm

Web Title: revenge gang raped of minor girl in up
Next Stories
1 पाच संसदीय समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे
2 संक्षिप्त : अरुण जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया
3 या शतकात तरी गंगा शुद्ध होईल का? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
Just Now!
X