उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर सशस्त्र दरोडेखोरांनी एक लग्नाच्या वऱ्हाडाला लुटले व नववधूची गोळया झाडून हत्या केली. दरोडेखोरांनी वहाऱ्डीमंडळींकडे असलेले लाखो रुपयांचे दागिने पळवले. डोराला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मातोरे गावाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
या हल्ल्यात नवरा मुलगा आणि चौघे जखमी झाले. गाझियाबाद जिल्ह्यात लग्नसोहळा आटोपून वहाऱ्डीमंडळी परतीच्या वाटेवर असताना हा हल्ला झाला. दोन कारमधून आलेल्या सहा सशस्त्र दरोडेखोरांनी वहाऱ्डीमंडळींना लुटले.
ॉदरोडेखोरांनी लुटीला विरोध करणाऱ्या फरहाना नावाच्या महिलेला ठार मारले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या नवरी मुलीला मुझफ्फरनगर येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 28, 2018 9:25 pm