१९ वर्षीय तरुणीवर धावत्या बसमध्ये बलात्काराची घटना होसकोटेमधील सुलाबेलीत घडली. एका खासगी रुग्णालयात कामाला जात असताना या तरुणीवर प्रवासादरम्यान बसमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत बसचालकाने बलात्कार केला. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये खासगी बीपीओमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. गुरुवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करताना आरोपी बसचालक आणि साहाय्यकाला (क्लीनर) अटक केली आहे. तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी राज्य सरकार महिलांची सुरक्षा गांभीर्याने घेत असून कायद्यांच्या चौकटीत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिलेआहे.