News Flash

इस्तंबूलमध्ये रुग्णालयातच पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या दोन वर्षांपासून हा अधिकारी रुग्णालयात उपचार घेत होता.

सलमा धरणास भारत आणि अफगाणिस्तानच्या 'मैत्रीचे धरण' ही म्हटले जाते. पंतप्रधान मोदींनी गत वर्षी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्याबरोबर याचे उद्घाटन केले होते.

एका बंदुकधारी पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने इस्तंबूलमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णालयातच त्याने बंदुकीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा पोलीस अधिकारी मनोरुग्ण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  याआधी, एका बंदुकधारी व्यक्तीने रुग्णांना ओलीस ठेवल्याचे वृत्त तुर्कस्थानच्या माध्यमांनी दिले होते. त्या व्यक्तीची ओळख पटली असून ती व्यक्ती पोलीस अधिकारी आहे असे समजले आहे.

हा पोलीस अधिकारी असून गेल्या दोन वर्षांपासून रुग्णालयात उपचारासाठी येत असे. रुग्णालयातील इतर रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली असून ते सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या बंदुकधारी पोलीस अधिकाऱ्याची समजूत काढली जात असून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2017 5:44 pm

Web Title: turkistan itanbul turkish media hospital hostage
Next Stories
1 पंजाबमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या सभेजवळ स्फोट, सहा ठार
2 सुनील जोशी हत्या प्रकरणातून साध्वी प्रज्ञा सिंगची निर्दोष मुक्तता
3 नोटाबंदी ही दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल: अॅपल सीईओ टीम कूक
Just Now!
X