scorecardresearch

रात्री १ वाजता गर्लफ्रेंडला भेटायला गेला, आईचा आवाज ऐकून इमारतीच्या छतावरून मारली उडी, मग झालं असं…

एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईच्या भितीने दोन मजली इमारतीच्या छतावरून उडली मारली.

Youth jumps from building
एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईच्या भितीने दोन मजली इमारतीच्या छतावरून उडली मारली. (प्रातिनिधिक फोटो )

तमिळनाडू येथील सालेम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईच्या भितीने दोन मजली इमारतीच्या छतावरून उडली मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. टीव्ही ९ भारतवर्षच्या रिपोर्टनुसार हा तरुण कोल्लापट्टी येथील सेंट्रल लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.

पोलिसांनी सांगितलं की, हा तरुण चिन्ना कोल्लापट्टी येथील एका अपार्टमेंटमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला आला होता. तेव्हा अचानक त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईचा आवाज ऐकला. आपण पकडले जाऊ या भितीने त्याने इमारतीच्या छतावरून उडी मारली. यात तो मृत पावला.

हा तरूण धर्मपुरी शहरातील कामराज नगर येथील रहिवासी होता. त्याचं नाव संजय चिन्ना असं असून तो लॉ कॉलेजमध्ये शिकत होता. तो कामराज नगरमध्ये मित्रांसोबत एका भाड्याने घेतलेल्या घरात राहात होता. शाळेत असल्यापासून त्याचं एका वर्गमैत्रिणीवर प्रेम होतं. ही मुलगी देखील त्याच परिसरात तिच्या आई आणि बहिणीसोबत राहते.

हे ही वाचा >> “…मी आत्महत्या करेन”, नव्या नवरीच्या चेहऱ्यावरील पदर हटवताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

रात्री एक वाजता गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास संजय त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या बिल्डिंगमध्ये गेला होता. तो जाताना पायऱ्यांवरून गेला. इमरातीच्या गच्चीवर दोघेजण बोलत उभे होते, तेव्हा तिच्या आईचा आवाज आला. हा आवाज ऐकून संजयने छतावरून उडी मारली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सालेम शासकीय रुग्णालयात पाठवला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 20:51 IST