scorecardresearch

“…मी आत्महत्या करेन”, नव्या नवरीच्या चेहऱ्यावरील पदर हटवताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

नवरीचा घुंघट (डोक्यावरील पदर) हटवल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली.

Fraud Wedding
नवरीचा घुंघट (डोक्यावरील पदर) हटवल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. (प्रातिनिधिक फोटो)

धुमधडाक्यात लग्न झालं, वाजत-गाजत वरात काढली आणि नवरदेव नवरीला घेऊन आनंदाने त्याच्या घरी आला. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. परंतु नवरी तिच्या सासरी आल्यावर मुंह दिखाईची प्रथा (नवरीचा चेहरा दाखवण्याची प्रथा) पार पाडली. पण तिचा चेहरा पाहून नवरदेव आणि त्याच्या घरातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. परिस्थिती इतकी बिघडली की, नवरदेव म्हणाला मला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन. हे अजब लग्न उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात नुकतंच झालं आहे.

संभल जिल्ह्यातल्या हजरत नगर गढी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कटौली गावात राहणाऱ्या डालचंद याचं लग्न कैला देवी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील मुलीशी ठरलं होतं. संभलमधील प्रथेनुसार लग्नात नवरीने चेहरा पदराने (घुंगट) झाकला होता. पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. दोघांनी सात फेरे घेतले आणि एकमेकांसोबत सात जन्म राहण्याचे वचन दिलं.

त्यानंतर नवरीची पाठवणी झाली आणि नवरीला घेऊन नवरदेव घरी आला. त्यानंतर नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याची (मुंह दिखाई) प्रथा सुरू झाली. नवरदेवाच्या घरातील महिलांनी जेव्हा नवरीच्या डोक्यावरील (चेहरा झाकलेला) पदर हटवला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं ती मुलगी तिथे नव्हती. तर तिच्याऐवजी तिच्या मोठ्या बहिणीसोबत मुलीकडच्या लोकांनी लग्न लावून दिलं होतं.

हे ही वाचा >> भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानी माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे निधन

“…तर मी आत्महत्या करेन”

नवरदेवाच्या पालकांनी आरोप केला आहे की, धाकट्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता, तिच्यासोबतच लग्न ठरलं होतं. परंतु मुलीकडच्या लोकांनी तिच्या मोठ्या बहिणीसोबत आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं आहे. ही मुलगी मानसिकदृष्ट्या ठिक नाही. तर मुलीच्या पालकांनी सांगितलं की, हुंड्याची मागणी झाल्यामुळे त्यांनी हे नाटक रचलं होतं. तर पीडित नवरदेव म्हणाला की, मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:56 IST
ताज्या बातम्या