दिल्लीजवळच्या नजफगडमधल्या द्वारका परिसरातील एका सलूनमध्ये शुक्रवारी (९ फेब्रुवारी) धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका सलूनमध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, “वैयक्तिक शत्रूत्वातून या हत्या करण्यात आल्या आहेत. आम्ही सध्या या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहोत.” गोळीबार आणि हत्येची ही घटना सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतंय की, दोन बंदूकधारी इसम सलूनमध्ये घुसले. त्यापैकी एका इसमाने सलूनमधील एका व्यक्तीला जवळून गोळ्या घातल्या. ती व्यक्ती बंदूकधारी इमसमाकडे विनवणी करत होती. जीवे मारू नये यासाठी हात जोडत होती. त्याचवेळी त्या बंदूकधारी इसमाने जीवाची भीक मागणाऱ्या व्यक्तीला गोळ्या घातल्या.

द्वारका येथील पोलीस उपायुक्त अंकित सिंह यांनी सांगितलं की, नजफगड पोलीस ठाण्यातील पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनवर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, इंद्रा पार्क, पिलार नंबर ८० च्या समोर एका सलूनमध्ये गोळीबार झाला आहे. यासह मोहन गार्डन पोलीस ठाण्यातही असाच फोन आला होता. या फोनवर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, गोळी लागून जखमी झालेल्या दोन इसमांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोन्ही व्यक्तींची नावं आशिष आणि सोनू अशी होती. उपचारांदरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा >> VIDEO : “हल्लेखोरांनी दगड-काठ्यांनी मारलं, महिलांना लाथा…”, रोहित पवारांनी सांगितलं पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमावेळी काय घडलं

न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की सोनूच्या डोक्यात एक गोळी लागली. तर आशिषच्या डोक्यात तीन आणि छातीत एक गोळी लागली आहे. प्राथमिक तपासांत पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार आशिष याआधी दोन गुन्ह्यांमध्ये अडकला होता. तर सोनूवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. वैयक्तिक वैमनस्यातून या हत्या झाल्या असाव्यात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 men shot dead inside najafgarh salon delhi caught on camera asc
First published on: 10-02-2024 at 12:57 IST