मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. दहा दहशतवाद्यांनी मृत्यूचं तांडव मुंबईत घडवलं होतं. या घटनेत २०० हून अधिक निरपराध लोकांचा बळी गेला. याच दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मास्टरमाईंड आझम चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू झाला. पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरात राहणाऱ्या आझम चीमाला हृदयविकाराचा झटका आला. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
आजम चीमा हा मुंबईत झालेल्या ट्रेन साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ चा दहशतवादी हल्ला या दोन्ही कटांचा मास्टरमाईंड होता. अमेरिकेने त्याला मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने या प्रकरणी भारतीय एजन्सीजवर आरोप केला आहे की लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांचे जे मृत्यू झाले आहेत त्यामागे भारत आहे असं म्हटलं होतं. मात्र भारताने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आम्ही अशा प्रकारे कुठल्याही हत्या किंवा मृत्यू घडवून आणलेल्या नाहीत असं भारताने म्हटलं आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा

पाकिस्तानात लपलेले मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा गेल्या काही महिन्यांमध्ये त्यू झाला आहे. हे दहशतवादी लष्कर ए तैयब्बाशी संबंधित होते.लष्करचा एक प्रमुख दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अदानानला कराची या ठिकाणी हल्ला करुन ठार करण्यात आलं. हंजला २०१६ च्या पंपोर हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या घटनेत ८ जवान शहीद झाले होते. मागच्या वर्षी २ आणि ३ डिसेंबरच्या रात्री त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.

अक्रम खान: लष्करशी संबंधित असलेला एक दहशतवादी अक्रम खान याची ९ नोव्हेंबरला हत्या झाली होती. ही हत्याही अज्ञातांनी केली होती.नोव्हेंबरला ख्वाजा शहिदचं अपहरण केलं गेलं. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या हत्यांमागे भारत आहे असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने हे आरोप फेटाळले आहेत.