सध्या देशभर दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. पण ऐन दिवाळीच्या काळात दिल्लीकर मात्र ‘झिंगाट’ असल्याचं समोर आलं आहे. कारण २०२२ च्या तुलनेत यावर्षी जवळपास दुप्पट मद्यविक्री झाल्याचा तपशील समोर आला आहे. दिल्लीकरांनी दिवाळीपूर्वीच दारूचा साठा केल्याचं यातून दिसत आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १८ दिवसांत तब्बल ३.०४ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल ५२५.८४ कोटी रुपये इतकी आहे. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी याच काळात २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती.

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी (१० नोव्हेंबर) १८,८९,९६९ बाटल्या विकल्या गेल्या. मागील वर्षी हा आकडा १५,०४,००० इतका होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी १९,३९,४९४ बाटल्यांची विक्री झाली होती. या तुलनेत शनिवारी (दिवाळीच्या १ दिवस आधी) तब्बल २७,८३,१७५ दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सध्या सणासुदीचा हंगाम आणि ‘ड्राय डे’ असल्यामुळे या काळात मद्याची विक्री वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सामान्यतः ड्राय डे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे, या काळात सरासरी दारुची विक्री वाढते.