पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या तिसऱ्या इंडिया-आफ्रिका फोरम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ट्रेडमार्क’ ठरलेला कुर्ता व चुडीदार पायजामा हे आकर्षण राहण्याची शक्यता आहे. या परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्व ५४ आफ्रिकी देशांचे प्रमुख हाच पोशाख करतील, अशी आयोजक परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची योजना आहे.
२६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या शिखर परिषदेच्या तयारीला लागलेल्या मंत्रालयाने आफ्रिकी देशांच्या सर्व राजदूतावासांना पत्र लिहून त्यांच्या संबंधित राष्ट्रप्रमुखांचा अध्र्या बाह्य़ांचा व उभ्या कॉलरचा कुर्ता व पायजामा यांचे ‘माप’ मागवले आहे. अशारीतीने सर्वाचा सारखा पोशाख असण्याची कल्पना पंतप्रधान कार्यालयाने उचलून धरली असून, त्यानुसारच राजदूतावास व वाणिज्य दूतावास यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत.
हे या परिषदेचे वैशिष्टय़ राहणार असून त्यामुळे भारताची आफ्रिकी देशांसोबतची एकता आणि दीर्घकाळापासूनची भागीदारी प्रदर्शित होईल, असे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आतापर्यंत कुठल्याही आफ्रिकी देशाच्या एकाही प्रतिनिधीने याबाबत आक्षेप घेतलेला नाही. काही जणांनी याबाबत काही प्रश्न विचारले होते व त्यांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
इंडिया-आफ्रिका फोरम शिखर परिषदेत सर्वाना कुर्ता-पायजमा
संबंधित राष्ट्रप्रमुखांचा अध्र्या बाह्य़ांचा व उभ्या कॉलरचा कुर्ता व पायजामा यांचे ‘माप’ मागवले आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 29-09-2015 at 00:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 african countries chief to wear kurta pajama in india africa forum summit conference