भारतात २०२० मध्ये दररोज सरासरी ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, ही आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये दररोज सरासरी ८० हत्यांसह भारतात एकूण २९,१९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या. २०१९च्या तुलनेत २०२०च्या आकडेवारीत १ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१९मध्ये दिवसाला सरासरी ७९ हत्यांसह एकूण २८,९१५ जणांची हत्या झाली होती.

२०२० मध्ये देशभरात सर्वाधिक ३ हजार ७७९ हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर, ३,१५० बिहारमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात २,१६३ हत्या झाल्या आहेत. तर, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये १,९४८ खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच राजधानी दिल्लीत २०२० या वर्षभरात ४७२ खून झाले, असंही या आकडेवारीत म्हटलंय.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

२०२० मध्ये दररोज सरासरी ७० बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. वर्षभरात बलात्काराच्या एकूण २८,०४६ घटना घडल्या. एनसीआरबीने म्हटले आहे की, गेल्या वर्षी देशभरात महिलांविरोधील ३ लाख ७१ हजार ५०३ गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली होती. २०१९ च्या तुलनेत २०२०मध्ये ८.३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९मध्ये महिलांविरोधातील ४ लाख ५ हजार ३२६ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२०मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक ५,३१० बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश २,७६९, मध्य प्रदेश २,३३९ आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्रात २,०६१ प्रकरणं नोंदवली गेली. २०१९ मध्ये एक लाख महिला लोकसंख्यमागे गुन्ह्यांचं प्रमाण ६२.३ टक्के होतं, तर हेच प्रमाण २०२०मध्ये ५६.५ टक्क्यांवर होतं.