Israel – Hamas War News in Marathi : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहेत. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हवाई हल्ले होत असून मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होत आहे. इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरातही याचे पडसाद उमटत आहे. परिणामी या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी नियोजित उड्डाणे काही काळासाठी स्थगित केली आहेत. या विमान कंपनीने ७ ऑक्टोबरपासून तेल अवीवला जाण्यासाठी आणि तेथून भारतात येणारी नियोजित उड्डाणे रद्द केली होती.

रविवारी एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, तेल अवीवची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. साधारणपणे, दिल्लीतून तेल अवीवला जाण्यासाठी आठवड्यातून पाच वेळा उड्डाणे असतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशी ही सेवा असते. परंतु, आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Viral Video The Air India staff who loads the luggage on the plane throws passenger musical instruments
धक्कादायक! सामान विमानात चढवताना प्रवाशाचे वाद्य दिलं फेकून; एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO पाहाच
israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय

हेही वाचा >> Israel and Hamas War: युद्ध आणखी भीषण होणार? इस्रायलचं लष्कर पुढच्या ४८ तासांत गाझा शहरात धडकणार!

दरम्यान, इस्रायलमध्ये अडकेलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरता सरकारकडून ऑपरेशन अजय राबवण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात ऑपरेशन अजय अंतर्गत हजारो भारतीय भारतीय मायदेशी परतले. ऑपरेशन अजयसाठी एअर इंडियाने चार्टर्ड सेवा पुरवली होती.

४८ तासांत युद्ध भडकणार?

पुढील ४८ तासांत इस्रायल लष्कर गाझा पट्टीवर आक्रमण करणार असल्याचं वृत्त इस्रायल माध्यमांनी दिलं आहे. तसंच, दक्षिण आणि उत्तर गाझा असे गाझा पट्टीचे दोन भाग झाल्याचेही वृत्तांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.