एअरो एशिया २०१३च्या उद्घाटनप्रसंगी अजितसिंग यांनी, भारतातील प्रवासी वाहतूक आणि विमानतळ पायाभूत सुविधा यांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. देशात आणखी १५ विमानतळांना सरकारने मान्यता दिल्याचेही ते म्हणाले. गेल्या १० वर्षांत प्रवासी वाहतुकीचा वार्षिक वृद्धिदर जवळपास १५ टक्के इतका राहिला आहे. पुढील १० वर्षांत देशांतर्गत प्रवासी वाहतूक वार्षिक १८० दशलक्ष प्रवासी इतकी होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वाहतूक ८० दशलक्ष इतकी होण्याची अपेक्षा आहे, असेही नागरी उड्डाणमंत्री म्हणाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अत्याधुनिक आणि देशी बनावटीच्या नव्या टर्मिनल इमारती कोलकाता आणि चेन्नईमध्ये बांधल्या आहेत त्याचा उल्लेख करून अजितसिंग यांनी, सरकारने हरितपट्टा धोरणाखाली आणखी १५ विमानतळे बांधण्याचे ठरविले असून त्यापैकी बहुसंख्य विमानतळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सहभागाने बांधण्यात येणार आहेत, असे सांगितले. भारतीय विमानतळांवरील प्रवासी क्षमतेमध्ये गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण देशातील ३५ बिगरमेट्रो विमानतळांचे आधुनिकीकरण करणार आहे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2013 रोजी प्रकाशित
कमी खर्चिक विमानतळ उभारणार
देशातील दुर्गम आणि अंतर्गत भागांत हवाई संपर्क स्थापित करण्यासाठी सरकारने कमी खर्चिक विमानतळ विकसित करण्याचे आणि प्रादेशिक विमान कंपन्यांना उत्तेजन देण्याचे ठरविले आहे, असे नागरी उड्डाणमंत्री अजितसिंग यांनी म्हटले आहे.
First published on: 07-02-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airport will make with low expenditure