पाचशे कोटींहून अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याच्या निवृत्तीला अवघे तीन दिवस शिल्लक होते. त्यापूर्वीच हा अधिकारी जाळ्यात अडकला आहे.

गोला वेंकटा रघुरामी रेड्डी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो पालिकेच्या नगरविकास विभागाच्या संचालक पदावर कार्यरत होता. सोमवारी रात्री एसीबीने त्याला अटक केली आहे. अटकेपूर्वी एसीबीच्या पथकाने त्याच्या घरावर आणि विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती आणि महाराष्ट्रातील शिर्डी येथील तब्बल १५ मालमत्तांवर छापे मारले. रेड्डी बुधवारी सेवेतून निवृत्त होणार होता. त्यानिमित्त त्याने आपले मित्र आणि नातेवाईकांसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. परदेशातील एका रिसॉर्टवर ही पार्टी होणार होती. त्यासाठी विमानाची तिकीटेही आरक्षित करण्यात आली होती. शिर्डीत त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. विजयवाडाजवळ ३०० एकर जमीन असून इतरही मालमत्ता आहे. याशिवाय एसीबीच्या अधिकाऱ्यांना रेड्डीच्या घरात ५० लाखांची रोकड सापडली आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून छापेमारीचे सत्र सुरू केले होते. मंगळवारीही कारवाई सुरूच होती. रेड्डीकडे अंदाजे ५०० कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. रेड्डीने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

रेड्डीकडील घबाड:

सोने आणि हिऱ्याचे दागिने – एकूण १० किलो

सोन्याचे दागिने – ४ कोटी

चांदीचे दागिने – ५ लाख

चांदी – २५ किलो

विजयवाडामध्ये अंदाजे ३०० एकर, वेलपूरमध्ये २ एकर जमीन

पत्नीच्या नावे मालमत्ता

कृष्णा जिल्ह्यात ११ एकरचा मॅँगो गार्डन

विजयवाडात दोन तीन मजली घरे, एक दुमजली घर

गुंटूरमध्ये ५.१५ एकर जागा

स्वतःच्या मालकीच्या चार कंपन्या