Apple iPhone Launch Event September 2018 :  अॅपल कंपनीने त्यांच्या आयफोन मालिकेतील तीन नवे आयफोन लाँच केले आहेत. यामध्ये आयफोन एक्सआर, आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्स मॅक्स यांचा समावेश आहे. बुधवारी रात्री या फोनचे अनावरण केले. आयफोनसह अॅ्पल वॉचच्या सुधारित सिरीज-४ या मालिकेतील उत्पादनांची घोषणा केली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कुपर्टिनो येथील अॅपल कंपनीच्या स्टीव्ह जॉब्ज सभागृहात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत. जाणून घेऊयात आयफोनचे फिचर आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती……

आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्स –

दोन्ही आयफोन भारतात २८ सप्टेंबर रोजी दाखल होणार
गोल्ड, सिलव्हर आणि स्पाईसी ग्रे या तीन रंगात उपलब्द
२४३६ बाय ११२५
५१२ जीबीचे स्टोअरेज
आयओएस – १२ प्रोसेसर
५१२ जीबीचे स्टोअरेज
आयओएस – १२ प्रोसेसर
ड्यूअल सिम
वाटरप्रूफ (दोन मीटर पाण्यात ३० मिनीटांमपर्यंत राहिल्यास काही होणार नाही)
आयफोन एक्सएस ५.८ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्लेसह
आयफोन एक्सएस मॅक्सचा स्क्रीन ६.५ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्ले
आयफोन एक्सएस मॅक्सला ३डी टच
ए-१२ बायॉनिक हा अधिक वेगवान प्रोसेसर
OIS सेन्सर्स
Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.
समोरील कॅमेरा सात मेगापिक्सल असेल.
ड्युल रियर कॅमेराचा ड्युल रियर कॅमेरा, यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार
फेस आयडी या फिचरमुळे चेहऱ्याच्या आधारे फोन अनलॉक केला जाऊ शकणार आहे.

Apple iPhone Xs ची भारतामध्ये किंमत ७६९०० पासून सुरू होईल.

Apple iPhone Xs Max ची भारतात किंमत १०९,९०० पासून सुरू होईल.

iPhone XR

आयफोन Xrची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू
आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही.
या आयफोनला haptic टच देण्यात आला आहे.
हा आयफोन ६.१ इंच असणार आहे.
या आयफोनची किंमत ५३८५० रूपयांपासून असणार आहे.
आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
बॅटरी आयफोन ८ पेक्षा दीड तास आधिक
तीन वेगवेगळ्या रंगामध्ये मिळणार
ए-१२ बायॉनिक हा अधिक वेगवान प्रोसेसर
फेस आयडी या फिचरमुळे चेहऱ्याच्या आधारे फोन अनलॉक केला जाऊ शकणार आहे.
२५६जीबी आणि ५१२ जीबी

अॅपल वॉच सीरिज – ४

किंमत 399 डॉलर(२८, ६८७रूपये) ते 499 डॉलर(३५८६९ रुपये) पर्यंत असेल.
विक्री १४ सप्टेंबरपासून १६ देशांमध्ये सुरू होणार आहे. परंतु यात भारताचं नाव नाही.
बॅटरी मर्यादा चार ते १८ तास
आधीच्या अॅपल वॉचपेक्षा याची स्क्रीन ३० टक्के मोठी
तीन रंगामध्ये उपलबद्ध अ
या वॉचमध्ये ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर
चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय दे
वॉचची साईज ४४ एमएम आहे.

या घडाळात तीन हार्ट फिचर देण्यात आले आहेत. यामध्ये लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी असे तीन हार्ट फिचर आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!

‘अॅपल’च्या इव्हेंटपूर्वी काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार नवीन डिवाईसची माहिती अपडेट करण्यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली होती. ‘Be right back’ असा मेसेज वेबसाईटवर येत होता. याशिवायय अॅपलचा लाईव्ह इव्हेंट सुरू होण्याआधीच YouTube वर फेक ट्रेंडिग सुरू झाले होते. यामध्ये Apple iPhone Event नावाचा एक चॅनलद्वारे फेक व्हिडीओ दाखवण्यात आला होता.