चार मूलद्रव्यांच्या संशोधनास मान्यता
गेल्या २०११ नंतर मूलद्रव्यांच्या आवर्ती सारणीत चार नवीन रसायनांची भर पडली असून आवर्ती सारणी म्हणजे पिरिऑडिक टेबल प्रथम रशियन वैज्ञानिक दिमीत्री मेंडेलिव्ह यांनी तयार केले होते. २०११ मध्ये मूलद्रव्य क्रमांक ११४ व ११६ यांची भर पडली होती. आता नवीन मूलद्रव्यांची छाननी केल्यानंतर त्यांचा समावेश आवर्ती सारणीत केला गेला आहे.
इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अॅप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने ३० डिसेंबर २०१५ रोजी छाननीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता मूलद्रव्य क्रमांक ११५, ११७ व ११८ यांच्या समावेशासाठी अमेरिकी व रशियन वैज्ञानिकांनी पुरेसे पुरावे दिले आहेत व शोधाचा दावा बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. ११३ क्रमांकाच्या मूलद्रव्याचा शोध लावण्याचे श्रेय जपानच्या रिकेन इन्स्टिटय़ूटला मिळाले आहे.
मूलद्रव्यांना नावे देताना त्यांचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना बोलावले जाते व नंतर नाव व चिन्ह दिले जाते. आययूपीएसी या संस्थेच्या इनऑरगॅनिक केमिस्ट्री विभागाचे अध्यक्ष प्रा. जॅन रीडजिक यांनी सांगितले, की या आवर्ती सारणीची सातवी रांग आता पूर्ण झाली आहे. आता या मूलद्रव्यांना नावे व चिन्हे दिली जातील. नवीन मूलद्रव्यांना पौराणिक, खनिजाधिष्ठित, देशाधिष्ठित किंवा वैज्ञानिकाचे नाव दिले जाऊ शकते.
आययूपीएसी विभाग नवीन मूलद्रव्यांच्या नावाला मान्यता देत असतो व दोन अक्षरांचे चिन्ह त्याला दिले जाते व नंतर ते पाच महिने लोकांच्या अवलोकनार्थ मांडले जाते, त्यानंतर या संस्थेचे संचालक मंडळ अंतिम निर्णय घेते. ही चारही मूलद्रव्ये जड असून ते प्रयोगशाळेत केलेले व किरणोत्सारी आहेत. त्यामुळे सातव्या रांगेतील रिकाम्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता वैज्ञानिक अधिक जड कृत्रिम मूलद्रव्ये तयार करू शकतील. काही लोक आवर्ती सारणीचा टॅटूही अंगावर काढून घेतात पण आता तो कालबाह्य़ ठरणार आहे. ही चार मूलद्रव्ये नैसर्गिक पातळीवर अस्तित्वात नाहीत. प्रत्येक मूलद्रव्याला अणुक्रमांक असतो तो त्याच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या सांगतो. हायड्रोजन हे सर्वात हलके मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक १ आहे तर हेलियमचा दोन आहे. नवीन मूलद्रव्यांच्या केंद्रकात ११३, ११५, ११७ व ११८ प्रोटॉन आहेत म्हणजेच ते खूप अस्थिर आहेत. कारण प्रोटॉन एकमेकांना दूर ढकलतात. युरेनियम हे सर्वात जड नैसर्गिक मूलद्रव्य आहे व त्यात ९२ प्रोटॉन असतात. ११७ क्रमांकाचे मूलद्रव्य तयार करताना वैज्ञानिकांनी कॅल्शियमचे केंद्रक (२० प्रोटॉन) बेर्केसियमच्या केंद्रकावर (९७ प्रोटॉन) आदळवले पण ते हे मूलद्रव्य १३ मिलिग्रॅम इतके तयार करायला वैज्ञानिकांना दोन वर्षे लागली. त्याचा अर्धआयुष्यकाल फार कमी म्हणजे सेकंदाच्या पन्नास हजारांश आहे. ११३ क्रमांकाचे मूलद्रव्य तयार करताना बिस्मथ व जस्त यांचे आयन्स एकमेकांवर आदळवण्यात आले, त्याचा अर्धआयुष्यकाल सेकंदाच्या हजारांशापेक्षा कमी आहे, असे जपानी वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

anti trafficking cells busted sex racket in pune
पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी