बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी जन धन खात्यातून लांबवले ६ हजार कोटी रुपये, कुमारस्वामींचा आरोप

बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी जन धन खात्यातून ६ हजार कोटी रुपये लांबवल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

kumaraswamy7591
(संग्रहित छायाचित्र)

बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी जन धन खाती हॅक करून प्रत्येक खात्यातून २ रुपये ट्रान्सफर करत सुमारे ६ हजार कोटी रुपये चोरीला गेले आहेत, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. “मला सांगण्यात आले आहे की जन धन खाते हॅक झाले आहे. जनधन खाते हॅक करून प्रत्येक खात्यातून २ रुपये ट्रान्सफर केले गेले. मला माहित नाही की ही बाब किती खरी आहे. पण एकट्या जनधन खात्यांमधील रकमेची किंमत एकूण ६ हजार कोटी रुपये आहे,” असे कुमारस्वामी म्हणाले.

भाजपा सरकार हा संपूर्ण प्रकार लपविण्यासाठी प्रयत्न करू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीला भारतासह अनेक देशांमध्ये कायदेशीर निविदा म्हणून मान्यता नाही. बिटकॉइन घोटाळ्याने कर्नाटक सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. शहरातील हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकी याच्याकडून अधिकाऱ्यांनी ९ कोटी रुपयांची बिटकॉइन्स जप्त केल्यानंतर या घोटाळ्यात राजकारणातील प्रभावी व्यक्ती सामील असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. श्रीकृष्णावर सरकारी पोर्टल हॅक करणे, डार्क नेटद्वारे ड्रग्ज मिळवणे आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देणे असे आरोपही आहेत.

“बिटकॉइन घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आधीप्रमाणे पुन्हा एकदा राज्यात भाजपाचा तिसरा मुख्यमंत्री दिसू शकतो,” असा दावा काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केला आहे.

दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bitcoin scam accused hacked jan dhan accounts transferred six thousand crore says kumaraswamy hrc

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या