scorecardresearch

नितीन गडकरी म्हणजे ‘स्पायडरमॅन’; भाजपा खासदाराचं लोकसभेत वक्तव्य

भाजपा खासदार नितीन गडकरींना लोकसभेत म्हणाला ‘स्पायडरमॅन’

भाजपा खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक करताना त्यांना ‘स्पायडरमॅन’ म्हटलं आहे. नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचं जाळं उभं केल्याचं सांगताना त्यांनी हे कौतुक केलं आहे.

लोकसभेत २०२२-२३ साठी ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी’ या विषयावरील चर्चेत सहभागी होताना अरुणाचलचे खासदार असणारे तापीर गाओ म्हणाले की, “मी नितीन गडकरींचं नाव बदलून स्पायडरमॅन ठेवलं आहे. स्पायडरमॅनच्या जाळ्याप्रमाणे नितीन गडकरी देशाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे टाकत आहेत. नितीन गडकरी आहेत तर शक्य आहे”.

तापीर गाओ यांनी यावेळी सांगितलं की, “केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असताना देशातील संवेदनशील भागांमध्ये आणि खासकरुन भारत-चीन सीमेवर रस्त्याच्या बांधकामाने वेग घेतला आहे”.

“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर चीनजवळील सीमेवरही रस्त्याचं बांधकाम वेगाने सुरु आहे. मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन लाइनवर दोन पदरी रस्ताही उभा राहत आहे,” असं तापीर गाओ म्हणाले. “स्पायडरमॅन आपल्या वेगाने रस्ते बांधणीचं काम सुरु ठेवतील अशी माला आशा आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

“भारत-चीन सीमेवर असणाऱ्या संवेदनशील परिसरांचा दौरा करण्यासाठी नितीन गडकरी यांनी एक समिती तयार केली आहे. रस्त्यांची स्थिती ठीक नसल्याने त्यांना यामध्ये जास्त वेळ लागत आहे. पण आता या सर्व ठिकाणी रस्त्यांचं बांधकाम सुरु आहे,” अशी माहिता तापीर गाओ यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mp tapir gao calls nitin gadkari spiderman for building web of roads across country sgy

ताज्या बातम्या