फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे. या वादळातून सावरण्यासाठी फिलीपाइन्स सरकारने आंतरराष्ट्रीय मदत मागविली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मंगळवार- बुधवारी या वादळाने मिंडानाओ बेटानजीकची शहरे उद्ध्वस्त केली. त्यानंतर आलेल्या पुरामुळे भूस्खलनाच्या असंख्य घटना घडल्या. शेकडो कुटुंबे या पुरामध्ये वाहून गेली. मृतांची संख्या ४७५ वर गेली आहे. ३७७ नागरिक बेपत्ता असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. सुमारे दोन लाख नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात अडचणी येत. सर्व मूलभूत सुविधा कोलमडून गेल्या आहेत. पुरांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यू बाटान येथील गरीब स्थलांतरितांचा समावेश सर्वाधिक आहे. एकटय़ा मिंडानाओ भागात २५८ मृतदेह सापडल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2012 रोजी प्रकाशित
बोफा वादळ बळींची संख्या ४७५
फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे. या वादळातून सावरण्यासाठी फिलीपाइन्स सरकारने आंतरराष्ट्रीय मदत मागविली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
First published on: 07-12-2012 at 06:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boofa cyclone killed 475 people