मोबाइल फोनची बॅटरी अधिक काळ टिकवू इच्छिणाऱ्यांनी बॅटरी १०० टक्के चार्ज करू नय़े केवळ ५० टक्केच चार्ज करावी़ त्यामुळे बॅटरीचा टिकावूपणा वाढतो, असा दावा तंत्रज्ञान तज्ज्ञांनी केला आह़े
तंत्रज्ञान तज्ज्ञ इरीक लायमर यांच्या म्हणण्यानुसार, फोन बॅटरी सातत्याने किंवा पूर्णपणे चार्ज करण्यापेक्षा केवळ ५० टक्केच चार्ज करणे सोयीचे आह़े बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्याबरोबरच शून्यापर्यंत डिस्चाचार्ज होऊ देण्यामुळेही हळूहळू बॅटरी खराब होत़े ‘द टेलिग्राफ’ मध्ये लायमर यांनी हे मत व्यक्त केले
आह़े
सातत्याने बॅटरी चार्ज करून फोन गरम ठेवण्यामुळेही वर्षांकाठी फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता असत़े बॅटरीचे पूर्ण चार्जिग फोनच्या कोणत्याही भागाला उपयुक्त नसत़े उलट सातत्याने असे करणे हे प्रत्येक भागाची काही प्रमाणात हानीच करत असत़े परंतु, असे असले तरीही महिन्यातून एकदा तरी बॅटरी पूर्ण डिसचार्ज करणेही फायद्याचे आहे, असेही लायमर यांचे म्हणणे आह़े
अधिक तापमानामुळे होणारे नुकसान मोबइल चार्ज झाल्यानंतरही चार्जिगला ठेवण्यामुळेही होऊ शकत़े लायमर सांगतात, बॅटरीसाठी आदर्श तापमान १५ अंश सेल्सियस आहे आणि सामान्यत: २५ अंश सेल्सियस तापमानात राहणाऱ्या बॅटऱ्यांची क्षमता दरवर्षी २० टक्क्यांनी कमी होत़े
सिग्नल कमी करणाऱ्या ठिकाणी फोन ‘विमान मोड’वर ठेवणे, ‘सायलेण्ट मोड’वर ठेवणे आणि जीपीएस यंत्रणा वापरणारे अॅप्लिकेशन बंद ठेवणे हेही मोबाइल बॅटरीची काळजी घेण्याचे काही उपाय त्यांनी सुचविले आहेत़
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
मोबाइल कमी चार्ज करणे फायद्याचे
मोबाइल फोनची बॅटरी अधिक काळ टिकवू इच्छिणाऱ्यांनी बॅटरी १०० टक्के चार्ज करू नय़े केवळ ५० टक्केच चार्ज करावी़ त्यामुळे बॅटरीचा टिकावूपणा वाढतो, असा दावा तंत्रज्ञान तज्ज्ञांनी केला आह़े तंत्रज्ञान तज्ज्ञ इरीक लायमर यांच्या म्हणण्यानुसार, फोन बॅटरी सातत्याने किंवा पूर्णपणे चार्ज करण्यापेक्षा केवळ ५० टक्केच चार्ज करणे सोयीचे आह़े

First published on: 03-07-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charge mobiles less to prolong battery life