चीनची पुन्हा घुसखोरी

लडाखमधील चुमार क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा घुसखोरी करून काही बंकर उद्ध्वस्त केले आणि सीमेवरील ठाण्यात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या वायरीही तोडल्या. एप्रिल महिन्यातही चीनने याच क्षेत्रात घुसखोरी केली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १७ जून रोजी चुमार क्षेत्रात घुसखोरी केली आणि बंकर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली.

लडाखमधील चुमार क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा घुसखोरी करून काही बंकर उद्ध्वस्त केले आणि सीमेवरील ठाण्यात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या वायरीही तोडल्या. एप्रिल महिन्यातही चीनने याच क्षेत्रात घुसखोरी केली होती. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १७ जून रोजी चुमार क्षेत्रात घुसखोरी केली आणि बंकर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे चीनच्या क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या वायरीही तोडल्या, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. भारत-चीन सीमेवर चुमार येथे चीनच्या सैन्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेट संपर्क उपलब्ध नाही. त्यामुळे या क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केली जात आहे. चुमार क्षेत्रात टेहळणी मनोरा उभारण्यात आला होता आणि त्याबद्दल चीनने हरकत घेतली होती. मनोरा तोडून टाकण्यात आल्यानंतर लष्कराने चीनच्या सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे बसविले होते.
लडाख-हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चुमार हे दुर्गम गाव असून हा आमचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनकडून दरवर्षी येथे हेलिकॉप्टरने घुसखोरी केली जाते. गेल्या वर्षी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने चीनचे काही सैन्य येथे उतरविण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chinese troops intrude into ladakh again vandalise indian bunkers