scorecardresearch

Premium

अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव मध्य प्रदेशात भाजपला महिलांची ‘शक्ती’!

‘‘तुमचा भाऊ, तुमचा मामा भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देईल, चिंता करू नका’’, हे मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहनां’ना दिलेले आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी खरे करून दाखवले आहे.

Congress defeat due to overconfidence Women power to BJP in Madhya Pradesh
अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव मध्य प्रदेशात भाजपला महिलांची ‘शक्ती’!

महेश सरलष्कर

नवी दिल्ली : ‘‘तुमचा भाऊ, तुमचा मामा भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देईल, चिंता करू नका’’, हे मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहनां’ना दिलेले आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी खरे करून दाखवले आहे. मध्य प्रदेशमध्ये पराभवाच्या निसरडय़ा रस्त्यावरून निघालेल्या भाजपने अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर मात केली. महिला, ओबीसी, दलित-आदिवासींची मते निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.  

Madhya Pradesh Congress
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!
Kamal nath and his son Nakul Nath join BJP
मध्य प्रदेशमध्येही खिंडार? कमलनाथ भाजपामध्ये गेल्यास १२ आमदार काँग्रेसचा ‘हात’ सोडणार, सूत्रांची माहिती
TAMILNADU POLITICS
अण्णादुराई, जयललिता ते थलपती विजय; तमिळनाडूच्या राजकारणावर सिनेसृष्टीचा प्रभाव काय? वाचा सविस्तर….
babulal marandi
झारखंडमध्ये राजकारण तापलं! ईडीची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा हेमंत सोरेन यांचा आरोप; भाजपानेही दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

२०१८ नंतरच्या दीड वर्षांच्या काँग्रेस सरकारचा कालावधी वगळता २००३ ते २०२३ या दोन दशकांमध्ये भाजपने मध्य प्रदेशमध्ये चौथ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. जनमत शिवराजसिंह यांच्या विरोधात जात असल्याची चाहूल लागल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील रणनीतीकारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न देताच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. शिवराज यांच्याविरोधात काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. २००५ पासून राज्याच्या नेतृत्वाचा एकमेव चेहरा पाहून जनताही कंटाळली असल्याचे त्यांच्या उघड नाराजीवरून दिसत होते. त्यामुळेच शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा संदेश भाजपने मतदारांपर्यंत  पोहोचवला होता. निवडणुकीचे नेतृत्व शिवराजसिंह यांच्या ताब्यात न देण्याचा निर्णय भाजपला फायद्याचा ठरला असे म्हणावे लागते.

हेही वाचा >>>जगभरात दरवर्षी २०० कोटी टन धूळ वातावरणात!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघाचे नेते शिवप्रताप, शहांचे विश्वासू भूपेंद्र यादव आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या चमूने मध्य प्रदेशच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. मतदानाच्या आधी दहा दिवस देखील भाजपला जिंकण्याची खात्री देता येत नव्हती. भोपाळ, उज्जैन, इंदूर आदी काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमित शहांनी  बैठका घेऊन रणनीतीमध्ये सातत्याने बदल केले होते. शिवराज भाजपसाठी प्रमुख प्रचारक असले तरी, त्यांच्याबरोबर इतर नेत्यांनाही प्रचारात उतरवण्यात आले होते.  शिवराज यांच्या ‘लाडली बहना’ योजनेचा भाजपने प्रचंड प्रचार केला. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय ‘लाडली बहना’ योजनेला द्यावे लागेल!

मध्य प्रदेशात भाजप तसेच, काँग्रेसने आश्वासनांची उधळण केली होती.  गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १२५० रुपये शिवराज सरकारकडून दिले जात होते. ही योजना निवडणुकीआधी सहा महिने एप्रिल-मेमध्ये सुरू केली गेली आणि महिला लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या लाभार्थीपर्यंत सरकार पोहोचले नाही, त्यांना निवडणुकीतील विजयानंतर लाभ देण्याचे आश्वासन दिले गेले.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस एकहाती जिंकू शकेल असा प्रचार काँग्रेसकडून केला जात होता. कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही ‘५० टक्के कमिशनवाले सरकार’ ही शिवराजसिंह यांच्याविरोधातील घोषणा आणि मतदारांची नाराजी काँग्रेसला मतदानामध्ये परावर्तित करता आली नसल्याचे दिसते.

ओबीसींना आकर्षित करण्यास काँग्रेस अपयशी

राहुल गांधी यांनी प्रचारामध्ये ओबीसी जनगणनेचा मुद्दा प्रमुख केला असला तरी, ओबीसींना आकर्षित करण्यात काँग्रेसला यश आले नसल्याचे निकालावरून दिसत आहे. काँग्रेसने कर्जमाफी, महिलांना दरमहा भत्ता ही आश्वासने दिली होती. मात्र मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणणे, त्यासाठी संघटनेचा कुशल वापर करणे या निवडणूक व्यवस्थापनामध्येही काँग्रेस मागे राहिल्याचे दिसते. लोक मतदान केंद्रांवर आपोआप जातील आणि आपल्याला जिंकून देतील हा अतिआत्मविश्वास काँग्रेसला पराभवाकडे घेऊन गेल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>>Telangana Election Result 2023 : बीआरएसच्या गाडीला ब्रेक, काँग्रेसच्या पंजाला साथ; कोणी किती जागांवर मारली बाजी?

भाजपच्या विजयातील महत्त्वाचे घटक

’‘मेरा बूथ सब से मजबूत’ ही बूथस्तरीय प्रभावी रणनीती, संघटनात्मक बांधणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकप्रियता.

’भाजपच्या ‘एमपी के मन में मोदी’ या मोहिमेचाही मतदारांवर प्रभाव पडल्याचा भाजपच्या नेत्यांचा दावा.

’पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवडणूक रणनीतीचा आणि प्रचाराचा परिणाम.

’भाजपमधील विविध अंतर्गत गटा-तटांना एकत्र बांधण्यात आणि त्यांना प्रेरित करण्यात केंद्रीय नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका. 

भार्गव यांचा नववा विजय 

प्रचार न करण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते गोपाळ भार्गव यांनी आपला नववा विजय नोंदवला. रहली मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या युवा नेत्या ज्योती पटेल यांचा ७२,८०० मतांनी पराभव केला. विधासभेतील सर्वात अनुभवी नेते आहेत.

चौहान मोठय़ा मताधिक्याने विजयी

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विक्रम मास्ताल यांचा १,०४,९७४ मतांनी पराभव केला. चौहान १९९०मध्ये प्रथम या मतदारसंघातून निवडून आले होते. विदिशातून ते सलग १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress defeat due to overconfidence women power to bjp in madhya pradesh amy

First published on: 04-12-2023 at 04:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×