केरळ काँग्रेसचे विद्यमान कार्यवाहक अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील खासदार एम. आय. शनवास यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. ते ६६ वर्षांचे होते.

१९८३ पासून शनवास हे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. २००९ पासून अद्यापपर्यंत ते वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आले होते. केरळमधील विद्यार्थी संघटनेतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी यापूर्वी युथ काँग्रेस आणि सेवा दलात काम केले आहे.

केरळमधील काँग्रेस नेते के. करुणाकरण यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्या तीन काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र गट निर्माण केला होता.