Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

लंडन : करोनाच्या कोविड १९ विषाणूमध्ये आता उत्परिवर्तनासाठी फारशा जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यात आणखी उत्परिवर्तने होण्याची शक्यता कमी आहे, याचाच अर्थ मानवी प्रतिकारशक्तीला चकवा देण्याची त्याची क्षमता आता कमी होत जाईल, असे अ‍ॅस्ट्राझेनेका- ऑक्सफर्ड  म्हणजेच भारतात उत्पादित  होत असलेल्या कोव्हिशिल्ड या लशीच्या निर्मात्या सारा गिलबर्ट यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले, की कुठलाही विषाणू पूर्णपणे उत्परिवर्तित होऊ शकत नाही कारण त्याच्या काटेरी प्रथिनाची आंतरक्रिया एसीइ २ या मानवी पेशीवरील संग्राहकाशी होत असते. त्यामुळे तो पेशीत प्रवेश करू शकतो.आता या विषाणूत आणखी उत्परिवर्तने होण्याची शक्यता नाही. ‘व्हॅक्सिन्स, व्हेरियंटस अँड इनफेक्शन’ या विषयावर रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन या संस्थेने बुधवारी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

त्यांनी सांगितले,की विषाणूच्या काटेरी प्रथिनात आणखी उत्परिवर्तने झाली तर तो मानवी पेशीवरील एसीइ २ या संग्राहकाशी आंतरक्रिया करून आत जाऊ शकणार नाही, शिवाय आता या विषाणूच्या काटेरी प्रथिनावरील पृष्ठभागावर उत्परिवर्तनासाठी फारशा जागा उरलेल्या नाहीत. त्यामुळे यापुढील काळात हा विषाणू संसर्गजन्य राहील तरी त्याची प्रतिकारशक्तीला चकवा देण्याची क्षमता कमी झालेली असेल.

सार्स सीओव्ही २ विषाणूची फ्लूच्या विषाणूंची तुलना केली तर या विषाणूमध्येही किरकोळ बदल होत राहतील, जसे इतर फ्लू विषाणूंमध्ये होत असतात. त्यासाठी नंतर लशींमध्येही काही अनुरूप बदल करता येतील. कालांतराने हे विषाणू फार शक्तिशाली राहात नाहीत. पण त्याला नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. असे असले तरी सार्स सीओव्ही विषाणू जास्त घातक बनण्याची शक्यता आता कमी झाली आहे. पुढील काळात कोविड १९ विषाणू हा इतर करोना विषाणूंप्रमाणेच राहील. त्यामुळे त्याचा प्रसार कमी होणार नाही पण सर्दीसारखे किरकोळ आजार होत राहतील.