इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अँपला आयर्लंडमध्ये मोठा धक्का बसला आहे. फेसबुक आणि इतर कंपन्यांसोबत लोकांचा वैयक्तिक डेटा शेअर केल्याची चौकशी केल्यानंतर व्हॉट्स अँपला गुरुवारी विक्रमी २२५ दशलक्ष युरो दंड ठोठावण्यात आला. आयर्लंडच्या प्रायव्हसी वॉचडॉगने हा दंड ठोठावला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्स अँपने सांगितले की दंड पूर्णपणे विसंगत आहे आणि कंपनी याविरोधात अपील करेल. युरोपियन लोकांची वैयक्तिक माहिती कशी गोळा केली आणि कशी वापरली हे आयोगाला सांगण्यात व्हॉट्स अँप अपयशी ठरले आहे. व्हॉट्स अँपवर फेसबुक आणि इतर कंपन्यांसोबत वापरकर्त्याची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. निर्णयाचा एक भाग म्हणून, नियामकांनी व्हॉट्स अँपला युरोपच्या गोपनीयता कायद्यातील विविध तरतुदी लागू करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

व्हॉट्स अँप प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, ते सुरक्षित आणि प्रायव्हसी प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. आम्ही पुरवलेली माहिती पारदर्शक आणि सर्वसमावेशक आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही काम केले आहे आणि असेच करत राहू. २०१८ मध्ये लोकांना देण्यात आलेल्या पारदर्शकतेबद्दल आजच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आणि दंड पूर्णपणे विसंगत आहे.