महेश सरलष्कर

टोंक (राजस्थान) :  दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी टोंकमध्ये लाहोर-कराची, पाकिस्तानचा उल्लेख करून काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधात मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. बिधुरींच्या वाचाळपणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले असून काहींनी बिधुरींवर नाराजी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”
pm narendra modi slams congress for sam pitroda inheritance tax remark
सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा; पित्रोदांच्या ‘वारसा कर’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
Mahua Moitra
उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

टोंक जिल्ह्यामध्ये गुर्जरांची आणि मुस्लीम मतदारांची संख्या तुलनेत जास्त आहे. रमेश बिधुरी हे गुर्जर असल्यामुळे भाजपने त्यांना टोंक जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी केले. बिधुरी यांनी टोंकमधील काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधातील लढाईला हिंदू-मुस्लीम रंग दिला आहे. इथे भाजपचे उमेदवार अजितसिंह मेहता यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बिधुरी यांनी राजस्थानच्या निवडणुकीवर लाहोरची नजर असल्याचे विधान केले. उदयपूरमध्ये कन्हय्यालालची हत्या, जयपूरमध्ये अपघातात मुस्लीम तरुणाच्या मृत्यूनंतर गेहलोत सरकारने मृत तरुणाच्या कुटुंबीयांना केलेली आर्थिक मदत अशा मुद्दय़ांचा उल्लेख करत मुस्लीमविरोधी आक्रमक भाषण केले. या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाल्यामुळे बिधुरी पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.  पण भाजपचे उमेदवार अजितसिंह मेहता यांच्या निवडणूक कार्यालयातील काही कार्यकर्त्यांनी बिधुरींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ‘बिधुरींच्या या भूमिकेमुळे मेहतांचे नुकसान होऊ शकते. मेहता स्थानिक उमेदवार असून २०१३मध्ये ते विजयी झाले होते. त्यामुळे आम्हाला विचारून बिधुरींनी बोलायला हवे होते’, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ‘बिधुरींना इथे पाठवू नका, त्यांनी जयपूरमध्ये राहावे, असे कळवले आहे’, असा दावा अन्य एका कार्यकर्त्यांने केला. काही कार्यकर्त्यांनी मात्र बिधुरींचे समर्थन केले. ‘टोंकमध्ये भाजपची लढाई ६० हजारांपासून होते. त्यामुळे इथे हिंदू-मुस्लीम अशीच लढाई होणार!’, असे अन्य कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ‘टोंक विधानसभा मतदारसंघामध्ये ६० हजारांहून अधिक मुस्लीम मतदार असून ते पायलट यांना एकगठ्ठा मतदान करतील. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी हिंदू ध्रुवीकरणाशिवाय पर्याय नाही’, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांने मांडले.

हेही वाचा >>>मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

शहांचा काढता पाय

टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी प्रचारसभा आयोजित केली होती. पण गर्दी नसल्याने शहांनी काढता पाय घेतला. शहांनी सभेला उपस्थित न राहता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठवले. जयपूरमधील भाजप नेत्यांची मोठी सभाही रद्द होण्याची शक्यता आहे.