श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची आज होणारी नार्को चाचणी रद्द झाली आहे. श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा आफताब पोलिसांनी वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर पोलिसांनी नार्को चाचणीची मागणी केली असता दिल्ली कोर्टाने त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र आज ही नार्को चाचणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

नार्को टेस्ट का होणार नाही?

आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. पण कोर्टाने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. या परवानग्या मिळण्यासाठी १० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को चाचणी करता येणार नाही.

desi jugaad boy started crying when traffic police caught his scooty funny video goes viral on social media
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
Meta CEO Mark Zuckerberg After Post Knee Surgery video of himself performing a leg press workout watch ones
मार्क झुकरबर्ग पुन्हा बॉक्सिंगचा सराव करण्यासाठी सज्ज; शस्त्रक्रियेनंतर पाच महिन्यांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाले, ‘तुमचं प्रेम…’
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

विश्लेषण: श्रद्धाच्या मारेकऱ्याची नार्को चाचणी होणार; ही चाचणी नेमकी होते कशी? यातून १०० टक्के अचूक निष्कर्ष येतात?

विश्लेषण: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे नार्को चाचणीची चर्चा; देशातील परवानगीपूर्व पहिला प्रयोग कुठे, केव्हा आणि कसा झाला?

फॉरेन्सिक सायन्स लॅब्रोटरीचे सहाय्यक संचालक डॉ संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला दिल्ली पोलीस आणि आमच्या संचालकांनी ही प्रक्रिया वेगाने करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. नार्को चाचणी घेण्यापूर्वीच्या काही महत्त्वाच्या बाबींवर आम्ही काम करत आहोत”.

दरम्यान, फॉरेन्सिक सायकॉलॉजी विभागाने प्रमुख पी पुरी यांनी सांगितलं आहे की “नार्को चाचणीच्या आधी आम्हाला पॉलिग्राफी चाचणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीची परवानगी आवश्यक आहे. कोर्टाने नार्को चाचणीसाठी परवानगी दिली असून पॉलिग्राफ चाचणीसाठी आम्ही परवानगी मिळण्याची वाट पाहत आहोत. एकदा परवानगी मिळाली की, पुढील १० दिवसांत सर्व काही पार पडेल”.

पॉलिग्राफ चाचणीतही संबंधित व्यक्ती खरं बोलत आहे की नाही? याची चाचपणी केली जाते. मात्र यामध्ये शारिरीक संकेतांकडे लक्ष दिलं जातं. म्हणजेच त्याचा रक्तदाब, ह्रदयाचे ठोके, श्वसनाचा वेग या गोष्टी पाहिल्या जातात. यानंतर त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं? याबाबत मूल्यांकन केलं जातं.