फॉरेन्सिक पथकाने गुरुवारी आफताब पूनावाला याला त्याच्या फ्लॅटवर नेलं, जिथे त्याने आपली प्रेयसी श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केले. दरम्यान फॉरेन्सिक पथकाचे प्रमुख संजीव गुप्ता यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना आफताबच्या फ्लॅटमध्ये नेमकं काय सापडलं याचा खुलासा केला आहे. किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले असून, नाल्यात काही हाडं सापडली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, फॉरेन्सिकला फक्त किचनमध्येच रक्ताचे डाग आढळले आहेत. कारण आफताबने केमिकलच्या सहाय्याने सर्व घऱ स्वच्छ करत डाग मिटवून टाकले होते. आफताबने पोलिसांना मृतदेहाचा एक तुकडा किचनमध्ये ठेवल्याचं सांगितलं होतं. तिथेच फॉरेन्सिकला रक्ताचे डाग आढळले आहेत.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

पुरावे शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक एका विशेष केमिकलचा वापर करत असतानाही त्यांना घऱात इतर कोणताही पुरावा मिळत नाही आहे. फॉरेन्सिकच्या माहितीनुसार, आफताब जिथे केमिकलचा वापर करु शकला नाही, फक्त त्या एकाच जागी रक्ताचे डाग आढळले आहेत. तपासात आफताबने रक्ताचे डाग मिटवण्यसाठी हायपोक्लोरिक अॅसिडचा वापर केल्याचं समोर आलं होतं.

आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. फॉरेन्सिक पथकाला, बाथरुममध्ये कोणताही पुरावा सापडलेला नाही. तसंच ज्या बेडरुममध्ये त्याने गळा दाबून श्रद्धाचा खून केला तिथेही काही सापडलेलं नाही.

Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा

ज्या फ्रीजमध्ये त्याने १७ ते १८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले होते तिथेदेखील काही आढळलेलं नाही. ज्या फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे होते, तिथे काही खाण्याच्या गोष्टी सापडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, फॉरेन्सिकला नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.

नेमकं प्रकरण काय?

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे.

श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचं ठरवलं. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं आहे.

आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.

मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.

पोलीस आफताबपर्यंत कसे पोहोचले?

श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसंच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचं आढळलं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या आहेत.