प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानच्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यामध्ये ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- ट्रॅक्टर मोर्चा : दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते; ४० शेतकरी संघटनांचा दावा

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आठ बस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

VIDEO: शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या

दरम्यान, हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.