गेल्या आठवड्यात अमेरिकेत टॉलिवूड अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला पोलिसांनी शिकागोत अटक केली. या प्रकरणात जोडप्याव्यतिरिक्त टॉलिवूडमधल्या अन्य पाच अभिनेत्रींचादेखील समावेश आहे. सेक्स रॅकेट प्रकरणात शिकागो कोर्टात ४२ पानी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासाअंतर्गत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातले मुख्य आरोपी असलेल्या किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती आणि त्याची पत्नी चंद्रा यांनी अमेरिकेतील तेलगू असोसिएशन ऑफ साऊथ कॅलिफोर्निया आणि नॉर्थ अमेरिका तेलगू सोसायटी यांसारख्या नामांकित संघटनेच्या नावानं बनावट लेटरहेट तयार केले होते. मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान व्हिसा मिळवण्यासाठी या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचं ‘दी इंडियन एक्स्प्रेस’नं म्हटलं आहे. सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या तेलगू अभिनेत्रींना तीन तासांचे  २५०० डॉलर्स म्हणजे दीड ते दोन लाखांहून अधिक रुपये मिळायचे.

Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Nuclear Power Corporation of India inviting applications for 400 Executive Trainees post in Mumbai Details Here
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

असा लावला शिकागो सेक्स रॅकेटचा छडा

२० नोव्हेंबरमध्ये शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महिला पोहोचली. आपण अभिनेत्री असल्याचा दावा तिनं केला होता. तिच्याजवळ B1/B2 व्हिजा होता. व्यावसायिक कारण, वैद्यकिय उपचार किंवा पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना हा व्हिजा देण्यात येतो. तिच्याजवळ अमेरिकेतील नामांकित संघटनेचं पत्र असल्यानं तिला व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण आली नाही. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमधील अमेरिकन दूतावासातून तिला व्हिसा मंजूर करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री असल्याचा दावा करणाऱ्या महिलेनं आपण तेलगू असोसिएशन ऑफ साऊथ कॅलिफोर्नियाच्या एका कार्यक्रमासाठी जात अमेरिकेत जात असल्याचं व्हिसाच्या अर्जात म्हटलं. अर्जात या संस्थेच्या बनावट पत्राव्यतिरिक्त तिनं अन्य कोणतीही माहिती जोडली नव्हती. दहा दिवसांसाठी ती अमेरिकेत राहणार होती. जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरूवात केली त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम संबधित संस्थेनं आयोजित केला नसल्याचं समोर आलं.

या व्यतिरिक्त या अभिनेत्रीकडे नॉर्थ अमेरिका तेलगू सोसायटीचीही बनावट आमंत्रण पत्रिका होती. २५ नोव्हेंबरला हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं तिनं सांगितलं. मात्र अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम या संस्थेनं आयोजित केला नव्हता इतकंच काय पण तिने सांगितलेल्या नावाच्या कोणत्याही अभिनेत्रीला आम्ही ओळखत नाही अशी माहिती एजंटनं पोलिसांना तपासात दिली. पोलिसांनी या अभिनेत्रीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ‘राजू’ नावाच्या व्यक्तीनं तिला बनवाट पत्र, मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी दिल्याचं तिनं कबुल केलं.

या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावताना किशन मोदुगुमुडी आणि त्याची पत्नी हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. हे दोघंही अमेरिकेत व्यावसायिक असल्याचं दाखवत होतं. मात्र, या खोट्या चेहऱ्याचा आडून सेक्स रॅकेट सुरू होतं. तेलगू चित्रपट सृष्टीतून आलेल्या अनेक अभिनेत्रींना हे दोघंही वेश्याव्यवसायत ढकलत होते. अमेरिकेत आल्यानंतर किशन या अभिनेत्रींची सोय स्वत:च्या घरात किंवा हॉटेलमध्ये करायचा. या मुली कार्यक्रमासाठी आल्या असल्याचं भासवत योग्य ग्राहक दिसताच या तरुणींना त्यांच्याकडे पाठवलं जायचं असंही तपासाअंतर्गत उघड झालं आहे. सेक्स रॅकेट चालवताना  तीन तासांठी दीड ते दोन लाख रुपये आकारले जायचे. या प्रकरणात अडकलेल्या तरुणी या अभिनेत्री, मॉडेल, अँकर असल्याचं किशननं भासवलं होतं.

कोण आहे सेक्स रॅकेट चालवणारा किशन मोदुगुमुडी आणि त्याची पत्नी चंद्रा?
एप्रिल २०१५ मध्ये किशन सहा महिन्यांचा व्हिसावर अमेरिकेत आला होता. आपण भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग असून अमेरिकेत या क्षेत्रासंदर्भात नव्या ओळखी तयार करण्यासाठी आलो आहोत असं त्यानं सांगितलं. त्याची व्हिसाची मुदत संपली असली तरी तो भारतात कधीही परतला नाही.

ऑगस्ट २०१५ मध्ये किशनची पत्नी चंद्रा उर्फ चंद्रकला सहा महिन्यांच्या व्हिसावर अमेरिकेत गेली. त्यानंतर ही मुदत तिनं फेब्रुवारी २०१६ पर्यंत वाढवून घेतली. मात्र मुदत संपनूही ती भारतात परतली नाही. अवैधरित्या हे दोघंही अमेरिकेत वास्तव्यास होते. या प्रकरणात जानेवारी २०१८ मध्ये दोघांनाही अटक झाली होती. तर एप्रिल २०१८ शिकागोमध्ये सुरू असलेलं सेक्स रॅकेट प्रकरण उघड झालं . या प्रकरणाचा तपास करत असताना या संपूर्ण सेक्स रॅकेटमध्ये किशन आणि त्याची पत्नी चंद्रकला यांचा हात असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी जेव्हा किशन आणि चंद्राच्या घरी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे वेगवेगळया बॅगेमध्ये ७० कंडोम सापडले. त्यांनी घरात एक नोंदवही ठेवली होती. त्या वहीमध्ये अभिनेत्रींची सर्व माहिती तसेच बनवाट कागदपत्रंही पोलिसांना आढळली.