संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० पर्यंत वाढविण्याचा विचार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे संचालक मंडळ करीत असून त्यादृष्टीने येत्या ५ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे. २० वर्षांहून अधिक काळ निवृत्तीवेतन घेणाऱ्या खातेधारकांना देण्यात येणारी बोनस रक्कम रद्द करण्याचाही या बैठकीत विचार होणार आहे. सध्या या क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे निवृत्तीवय ५८ असल्याने त्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येत नाही, हे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नाडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.