पीटीआय, मुंबई, नवी दिल्ली

एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने सहप्रवासी महिलेशी घृणास्पद कृत्य केल्यानंतर ही घटना हाताळण्यात एअर इंडियाने केलेल्या दिरंगाईबाबत टीकेचा भडीमार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी रविवारी, ‘‘इअर इंडियाने या प्रकाराची तत्परतेने दखल घेणे आवश्यक होते, मात्र आम्ही त्यात कमी पडलो,’’ अशा शब्दांत खेद व्यक्त केला.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यू यॉर्क ते नवी दिल्ली दरम्यानच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद पुरुषाने ७० वर्षीय महिला प्रवाशावर लघूशंका केली होती. हा हिडीस प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागितले होते.

ही घटना तत्परतेने आणि ज्या प्रकारे हाताळणे अपेक्षित होते, तशी ती हाताळण्यात आम्ही अयशस्वी झालो, अशी कबुली टाटा चंद्रशेखरन यांनी एका निवेदनाद्वारे दिली. टाटा समूहाची भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखरन म्हणाले की, माझ्यासाठी आणि माझ्या ‘एअर इंडिया’च्या सहकाऱ्यांसाठी ‘एअर इंडिया’च्या विमानात घडलेली घटना दु:खदायक बाब आहे. एअर इंडिया आपल्या प्रवाशांचे हितरक्षण आणि सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहे.

‘डीजीसीए’कडून एअर इंडियाला नोटीस
‘डीजीसीए’ने ही घटना हाताळताना ‘एअर इंडिया’चे वर्तन व्यावसायिक पद्धतीचे नसल्याचे नमूद करीत एअर इंडिया, संबंधित अधिकारी, वैमानिक आणि कर्मचारीवर्गास ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.