scorecardresearch

आ बैल मुझे मार! बैलाने कंपनीच्या कार्यालयासमोर लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल

सिंगरेनी कोलरीज कंपनीच्या कार्यालयासमोर बैलाने लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आ बैल मुझे मार! बैलाने कंपनीच्या कार्यालयासमोर लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल
प्रातिनिधीक छायाचित्र, सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

सिंगरेनी कोलरीज कंपनीच्या कार्यालयासमोर बैलाने लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार तेलंगणातील येन्नालाडू येथे उघडीस आला आहे. सुंदरलाल लोढा असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करत असताना हा प्रकार घडला.

हेही वाचा – Morbi Bridge Collapse: TMC चे प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांकडून अटक, पक्षाच्या खासदाराचं ट्वीट

सुंदरलाल लोढा यांची जमीन सिंगरेनी कोलरीज कंपनीकडून अधिग्रहीत करण्यात आली होती. मात्र, लोढा यांना जमिनीचा योग्य तो मोबदला न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी एसएससीएल व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर बैलगाडीत बसून आंदोलन सुरू केले.

हेही वाचा – सात वर्षांपूर्वी खून झालेली मुलगी सापडली जिवंत; आरोपी अजूनही तुरुंगात; कुटुंबीयांची कोर्टात धाव!

दरम्यान, कार्यालयाच्या गेटसमोरच बैलाने लुघशंका केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. येन्नालाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या तक्रारीनंतर शेतकऱ्याविरोधात भांदविच्या कलम २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:26 IST

संबंधित बातम्या