मदुरैमध्ये एका ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडल्याचं समोर आलं आहे. या आगीत ट्रेनचा डबा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार चालू आहे. ही एक खासगी टूरिस्ट ट्रेन असल्याची माहितीही समोर आली आहे. यासंदर्भात रेल्वेकडून अधिक तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

लखनौहून रामेश्वरमला निघालेल्या या ट्रेनच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. मदुरई स्थानकाजवळ ही ट्रेन पोहोचल्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मदुरई यार्ड जंक्शनजवळ ट्रेन थांबलेली असताना आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा

कोचमधून सिलेंडरची छुपी वाहतूक?

दरम्यान, आग लागलेल्या कोचमध्ये काही प्रवाशांनी गॅस सिलेंडर चोरून नेल्याचं सांगितलं जाच आहे. या सिलेंडर्समुळेच आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.