माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं शनिवारी दिल्लीतील एम्स रूग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. 9 ऑगस्टपासून त्यांच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. अरूण जेटली यांचा देशातील दिग्गज वकीलांमध्ये समावेश होतो. त्यांनी 80 च्या दशकात सर्वोच्च न्यायालय आणि देशातील उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अनेक खटले लढवले होते.

1990 मध्ये जेटली यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकीलाचा दर्जा दिला. तर तत्कालिन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या कार्यकाळात त्यांना अॅडिशनल सॉलिसिटर जनरलचे पद देण्यात आले होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव आलेल्या बोफोर्स घोटाळ्याच्या खटल्याशी संबंधित पेपरवर्क त्यांनी पूर्ण केलं होते. तर पेप्सिको विरूद्ध कोका कोला खटल्यातही जेटली पेप्सिकोच्या बाजूनं खटला लढले होते. 2009 मध्ये त्यांनी वकीली करणं सोडलं होतं.

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं शनिवारी निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांनी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.