फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या आगामी भारत भेटीस विरोध म्हणून भारतातील फ्रान्स दूतावासाला धमकीचे पत्र देण्यात आले आहे.

ओलांद यांच्या भारत भेटीला विरोध करणारे पत्र ११ जानेवारी रोजी फ्रान्स दूतावासाला मिळाले. अवघ्या तीन ओळींचे हे पत्र असून त्यातील तपशील स्पष्ट करण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नकार दिला.

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्या ओलांद यांनी भारतात येऊ नये, असे पत्रात सांगण्यात आले आहे. याबाबत १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हे पत्र चेन्नईवरून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या पत्रात पत्ता देण्यात आलेला नाही, असे बंगळुरूच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सांगितले.