तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र गोरखाभूमीच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंददरम्यान हिंसाचाराचा उद्रेक झाला असून दार्जिलिंग शहरात गृहरक्षक दलाच्या एका जवानाला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे.
प्रकियाथोंद येथे अज्ञात व्यक्तींनी गृहरक्षक दलाच्या जवानाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जवान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दार्जििलग भेटीवर आल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या बंगल्यात वास्तव्याला होत्या, तो वनविभागातील बंगलाही जाळण्यात आला आहे.
मोंगपो येथे काल एक ट्रक आणि एका मोटारीला आग लावण्यात आली तर काही ठिकाणी पोलीस बूथही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खबरदारीचे उपाय म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कंपनीला पाचारण करण्यात आले असून आणखी चार बटालियन्स या डोंगराळ भागांत येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.