तेलंगणा विधेयकावरून लोकसभेत गोंधळ घालण्यापेक्षा अखंड तेलंगणा समर्थक खासदारांनी संसदीय कौशल्य दाखवून आपले मत मांडले असते तर, लोकशाहीला अधिक बळकटी आली असती असे म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी लोकसभेत गोंधळ घातलेल्या खासदारांवर निशाणा साधला आहे.
तेलंगणला होकार!
दिग्विजय आपल्या ट्विटरवर म्हणतात, तेलंगणा विधेयक ३८ सुधारणांसह आवाजी मताने लोकसभेत मंजूर झाले. फक्त अखंड तेलंगणा समर्थक खासदारांनी शक्तीपेक्षा आपल्यातील संसदीय कौशल्याचा वापर केला असता तर, लोकशाहीला बळकटी मिळाली असती. तसेच सीमांध्रतून होणाऱया विरोधाचाही विचार करून योग्य त्या तरतुदी कऱण्यात आल्या आहेत. असेही दिग्विजय म्हणाले
राष्ट्रीय एकता हे आपले सर्वोच्च मूल्य आहे. या विचारातून आंध्रप्रदेशातील प्रत्येक नागरिक निस्वार्थीपणे सीमांध्रतील जनतेशी जुळवून घेईल याचा विश्वास असल्याचेही दिग्विजय यांनी म्हटले आहे.