एपी, खान युनिस

गाझा शहरात इस्रायली सैन्याने रात्रभर आणि रविवारीही जोरदार हल्ले केले. लष्कराने या भागातील सगळय़ात मोठय़ा रुग्णालयाजवळ हमास अतिरेक्यांशी लढा दिला. हजारो वैद्यकीय अधिकारी, रुग्ण आणि विस्थापित लोक शिफा रुग्णालयात अडकले असून, वीज नसल्यामुळे आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे सर्वाचे हाल होत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
israel withdraws troops from southern gaza
दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?

 युद्धविरामासाठी जगभरातून आवाहन केले जात असले, तरी हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या २४० जणांची सुटका केल्याशिवाय युद्धविराम होणार नाही असे पंतप्रदान बिन्यामिन नेतान्याहू यांनी शनिवारी दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात सांगितले. इस्रायल लढाईत आपली ‘संपूर्ण ताकद’ लावली असल्याचे ते म्हणाले.

 गाझामधील हमासची १६ वर्षांची सत्ता संपवण्याची, तसेच त्याच्या लष्करी क्षमता चिरडून टाकण्याची प्रतीज्ञा इस्रायलने केली आहे. या युद्धात झालेल्या भीषण जीवहानीसाठी आणि वेढल्या गेलेल्या या भागात लोक अडकून पडल्यासाठी हमासच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत गुजरातमध्ये ७१ कैद्यांची सुटका, कारण सांगत गृहमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने…”

 युद्धाला सहा आठवडे झाले असताना, जवळचा मित्र असलेल्या अमेरिकेसह इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव येत आहे. अंदाजे ३ लाख पॅलेस्टाईन समर्थकांनी शनिवारी रस्त्यांवर मोर्चा काढला. युद्ध सुरू झाल्यापासून या शहरात झालेले हे सर्वात मोठे निदर्शन होते.

गाझा शहरात शिफा हॉस्पिटलच्या आसपासच्या भागात रात्रभर जोरदार हवाई हल्ले आणि तोफगोळय़ांचा मारा झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. या रुग्णालयाच्या आतील भागात आणि कुंपणाखाली हमासने कमांड पोस्ट दडवली असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे, मात्र त्याचा काही पुरावा दिलेला नाही. हमास आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे आरोप नाकारले आहेत.