हिमाचल प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या वर्षी येथे विधनासभा निवडणूक होणार असल्यामुळे राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला हादरा बसेल असे भाकित काँग्रेसकडून केला जात आहे. तर यावेळीदेखील आमचीच सत्ता येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. असे असताना आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली. काँग्रेस पक्ष देशातून समाप्त झाला आहे, असे ठाकूर म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट; पूर्वोत्तर राज्ये, दक्षिणेकडे मोसमी पावसाची हजेरी

“एकेकाळी काँग्रेसचा काळ होता. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. देशातून काँग्रेस पक्ष समाप्त झाला आहे. सध्या त्यांचे राष्ट्रीय नेते जामिनावर आहेत. निरोपाचा सूर देशभर पोहोचला आहे,” अशी खरमरीत टीका जयराम ठाकूर यांनी केली आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

तसेच पुढे बोलताना हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येक पाच वर्षात सत्ताबदल होतो. मात्र यावेळी येथे सत्ताबदल होणार नाही. यावेळी राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. नुकत्याच पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये त्यांचीच सत्ता येईल असा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र निकाल वेगळा लागला. पंजाबमध्ये तर माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी दोन्ही ठिकाणांमधून पराभूत झाले. काँग्रेसजवळ फक्त एकच राज्य होते. तेही राज्य काँग्रेसच्या हातातून गेले. तर चारही राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली, असे जयराम ठाकूर म्हणाले.

हेही वाचा >>> संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा

दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने मोठे बदल केले आहेत. काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात एक राष्ट्रीय सचिव देण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी या निवडणुकीचे नेतृत्व प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.