राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजतागायत स्वतःची कोणत्याही कायद्याखाली नोंदणी केलेली नसतानाही त्यांना ‘एके-४७’सारखी अत्याधुनिक शस्त्रे कशी काय उपलब्ध होतात, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला.

संघाच्या विजयादशमी उत्सवातील शस्त्रपूजनाला आक्षेप घेताना आंबेडकरांनी कोणत्याही कायद्याच्या कक्षेत नसलेल्या संघाकडील सर्व शस्त्रे जप्त करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. तसेच संघाला दहाच दिवसांमध्ये नोंदणी करण्याचा आदेशही देण्याची मागणी मोदींकडे केली. एक पत्रकाद्वारे त्यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे.