फुफ्फुसात विषाणूसंसर्ग झाल्याने ९२ वर्षांचे माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनकच असल्याचे समजते.गुजराल यांना १९ नोव्हेंबरलाच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते अद्याप कृत्रिम श्वसनयंत्रणेवरच आहेत. गेले वर्षभर त्यांना डायलेसिस करावे लागत आहे.गुजराल हे २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८ या ११ महिन्यांसाठी देशाच्या पंतप्रधानपदी होते. जनता दलप्रणीत आघाडीने त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
गुजराल यांची प्रकृती चिंताजनक
फुफ्फुसात विषाणूसंसर्ग झाल्याने ९२ वर्षांचे माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनकच असल्याचे समजते.

First published on: 26-11-2012 at 01:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I k gujral stable but critical