काही दिवसांपूर्वी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसह निकाह केला. त्याचा फोटोच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. सानिया मिर्झाने त्याला खुला म्हणजेच तलाक दिला. सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्री बरोबर त्याने तिसरं लग्न करुन संसार थाटला आहे. शोएबवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. शोएब आणि सानिया यांच्यात काहीही सुरळीत नाही अशा बातम्या गेल्या वर्ष ते दोन वर्षे येत होत्या. त्या सगळ्या चर्चांचं कारण शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सगळ्यांना कळलंच. आता प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी परखड मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे तस्लिमा नसरीन यांची पोस्ट?

मला वाटत होतं की शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे एक आनंदी जोडपं आहे. मात्र माझं असं वाटणं हे चुकीचं होतं. सानिया मिर्झासारखी हुशार मुलगी अशा Bad Boy शी लग्न कसं काय करु शकते? शोएब मलिक एक दिवस सना जावेदलाही घटस्फोट देईल आणि X बरोबर लग्न करेल. नंतर X ला घटस्फोट देईल, Y बरोबर लग्न करेन, त्यानंतर Y ला घटस्फोट देऊन Z शी लग्न करेल. त्याचा इस्लामवर विश्वास असेल तर त्याला घटस्फोट घेण्याचीही गरज नाही. एकाच वेळी तो चार बायकाही तो नांदवू शकतो. अशी पोस्ट तस्लिमा नसरीन यांनी केली. इतकंच काय तो त्याच्या धर्मगुरुंना मानत असेल तर तो एकावेळी ११ बायकांशीही संसार करु शकतो. या आशयाची पोस्ट तस्लिमा नसरीन यांनी केली आहे.

सानियाशी शोएबचं दुसरं लग्न झालं होतं

४१ वर्षीय शोएब आणि सानिया मिर्झाचं २०१० साली लग्न झालं होतं. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता. सानिया आणि सोहराब मिर्झा यांचा साखरपुडा झाला पण लग्न झालं नव्हतं. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते. ४१वर्षीय शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्ये दहाहून अधिक संघांसाठी तो नियमित खेळतो.

हे पण वाचा- शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर सना जावेदची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “सानिया मिर्झासाठी…”

१७ जानेवारीच्या दिवशी सानिया मिर्झाने काय पोस्ट केली होती?

सानिया पोस्टमध्ये म्हणते.. ‘लग्न असो किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. जाड राहणं कठीण आहे आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. कर्जात बुडणं कठीण आहे, आर्थिक शिस्त लावणंही कठीण आहे. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. बोलणं कठीण आहे आणि मौन बाळगणंही कठीण. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. आयुष्य कधीही सोपं नसतं ते कठीणच असतं. आपण ते आपल्या मेहनीतने निवडतो. त्यामुळे विचार करा आणि मग निवड करा.’ या आशयाची एक पोस्ट सानिया मिर्झाने लिहिली होती. तिच्या पोस्टचा अर्थ २० जानेवारीच्या दिवशी सगळ्यांना उलगडला. तसंच आता तस्लीमा नसरीन यांनी शोएब मलिकला बॅड बॉय म्हणत त्याच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे.

तस्लिमा या प्रसिद्ध लेखिका आहेत. तस्लिमा नसरीन यांच्या ‘लज्जा’ या पुस्तकावर बांगलादेशात कडाडून टीका झाली होती. कट्टरपंथी संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने त्यांना १९९४ मध्ये बांगलादेश सोडावे लागले होते. तस्लिमा यांच्याकडे स्वीडिश नागरिकत्व असूनही ती गेल्या दोन दशकांपासून यूएस आणि युरोपमध्ये वास्तव्यास असले तरी, त्या बहुतेक वेळा अल्प निवास परवान्यावर भारतात राहत होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I think shoaib malik will divorce sana javed someday and marry writer taslima nasreen post viral scj
First published on: 25-01-2024 at 14:38 IST