नागपूर: नागपूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या काळात गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

देवेंद्र गोडबोले जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते रामटेक तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा तालुका पक्षफुटीनंतर दोन गटात विभागला गेला. या भागाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल हे शिंदे गटासोबत आहे. रामटेकमधून ते विधानसभेची निवडणूक लढवत आहे. गोडबोले हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे. या पक्षाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे.  बरबटे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा राबत असताना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> विजयाचे लक्ष्य, म्हणून बंडखोरी थंड करण्याचे भाजपचे प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षात कोंडी झाल्याने राजीनामा दिला.मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम आहे, असे गोडबोले यांनी सांगितले. तालुक्यात भाजप, कॉंग्रेस आणि सेनेचा शिंदे गट यांची राजकीय ताकद आहे. या तीन मोठ्या पक्षात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी होत आहे. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. गोडबोले यांनी रामटेक येथून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज होते. पक्ष सोडणार नाही असे गोडबोले यांनी सांगितले असले तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लावले जात आहे.