दिल्लीतील रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवणा-या गुरमेहर कौरने बलात्काराची धमकी देणा-यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी कोणालाही घाबरत नाही. माझ्या वडीलांनी देशासाठी कारगिलमध्ये बलिदान दिले. मीदेखील देशासाठी बंदुकीच्या गोळ्या खायला तयार आहे’ अशी प्रतिक्रिया कौरने दिले आहे.

गेल्या आठवड्यात रामजस महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. उमर खालीद आणि शेहला रशीद यांच्या भाषणाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अभाविपने विद्यार्थ्यांना आणि महिला पत्रकारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटले होते.

Manoj Jarange Patil
“हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला…”, प्रकाश शेंडगेंना मिळालेल्या धमकीप्रकरणी मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
doctor denied treatment
डॉक्टरांना उपचार नाकारण्याचा अधिकार आहे का? कायदा काय सांगतो?
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!

लेडी श्रीराम कॉलेजच्या गुरमेहर कौर या तरुणाीने अभाविपविरोधात मोहीम सुरु केली आहे. गुरमेहर कौरचे वडील कॅप्टन मनदीप सिंग हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. या मोहीमेवरुन गुरमेहर कौरविरोधात आक्षेपार्ह टीका होती. काही जणांनी तिला थेट बलात्काराची धमकीच दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरमेहर कौरने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी कोणालाही घाबरणार नाही, माझ्या वडीलांनी देशासाठी प्राण दिले होते. मीदेखील देशासाठी बंदुकीच्या गोळ्या खायला तयार आहे’ असे गुरमेहर कौरने म्हटले आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उमर खालिदवर दगडफेक केली नव्हती. उमर खालिद त्या दिवशी उपस्थित नव्हता असेही तिने स्पष्ट केले. अभाविपने विद्यार्थ्यांवर दगडफेक केली असा आरोप तिने केला. ‘माझे देशावर प्रेम आहे. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करते’ असे तिने नमूद केले. अभाविप असो किंवा अन्य कोणतीही विद्यार्थी संघटना कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचे अधिकार कोणालाही नाहीत असे तिने सांगितले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनीदेखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरमेहर कौरचे नाव न घेता रिजीजू म्हणाले, या तरुणीचं डोकं कोण खराब करतंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.