सन २०३० पर्यंत एक उगवती आर्थिक महासत्ता, अशी नवी ओळख भारताला मिळेल, असे भाकीत अमेरिकेने केले आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘ग्लोबल ट्रेंड्स २०३०- आल्टरनेटिव्ह वल्र्ड्स’ या अहवालात हे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
आर्थिक महासत्ता या नात्याने चीनचा सध्या जेवढा दबदबा आहे, ती उंची भारत २०३०पर्यंत गाठेल. चीनचा सध्याचा आठ ते १० टक्क्य़ांचा विकास दर २०३० पर्यंत सातत्य राखू शकणार नाही. या कालावधीत आशिया खंडात चीनच आघाडीवर राहील, मात्र भारताचीही कमालीची भरभराट होईल आणि या दोन देशांमधील आर्थिक दरी खूपच कमी होईल, २०१६ पर्यंत चीनमधील कामगारांचे प्रमाण सर्वाधिक असेल, मात्र त्यानंतर त्यात घसरण होईल आणि २०३०च्या अखेरीस ते ९९ कोटींवरून ९६ कोटींपर्यंत घसरेल, भारताला मात्र २०५०पर्यंत काम करणाऱ्या हातांची चिंता भासणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या वरचढ
भारत आणि पाकिस्तानमध्ये आर्थिक आघाडीवर मोठी तफावत असल्याचे यात म्हटले आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सध्या आठपट आहे, मात्र २०३०पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १६पटीने मोठी असेल, असे हा अहवाल सांगतो.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
२०३० पर्यंत भारत आर्थिक महासत्ता होणार
सन २०३० पर्यंत एक उगवती आर्थिक महासत्ता, अशी नवी ओळख भारताला मिळेल, असे भाकीत अमेरिकेने केले आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘ग्लोबल ट्रेंड्स २०३०- आल्टरनेटिव्ह वल्र्ड्स’ या अहवालात हे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
First published on: 11-12-2012 at 05:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will become economically super power by