इंडियन एक्सप्रेस समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्वाधिक वाचक संख्येच्या बाबतीत ‘इंडियन एक्सप्रेस डिजिटल’ कंपनी भारतातील द्वितीय क्रमांकाची कंपनी ठरलीये. इंडियन एक्सप्रेस, जनसत्ता, फायनान्शियल एक्स्प्रेस आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या इंडियन एक्सप्रेस समूहाने ऑनलाइन विश्वात जोरदार मुंसडी मारली आहे. वृत्तपत्राबरोबरच या समूहाच्या प्रकाशनांच्या ऑनलाइन वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे डिसेंबर २०१६ मधील ‘कॉमस्कोअर’च्या अहवालात म्हटले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ऑनलाइन वाचकांची संख्या तिपटीने वाढली असल्याचे ‘कॉमस्कोअर’ने म्हटले आहे. एक्सप्रेस समूहाची ‘लोकसत्ता डॉट कॉम’ ही वेबसाइट सलग पाच महिने मराठी ऑनलाईन विश्वातील पहिल्या क्रमांकाची न्यूज वेबसाइट ठरली आहे. व्यापार आणि वाणिज्य या प्रकारात फायनान्शियल एक्स्प्रेस वेबसाइट दुसऱ्या क्रमांकाची वेबसाइट ठरली आहे. ‘जनसत्ता डॉट कॉम’ ही वेबसाइट सर्वाधिक वेगाने वाढणारी हिंदी न्यूज वेबसाइट ठरली आहे.

मोबाइल, डेस्कटॉप या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ‘इंडियन एक्सप्रेस’ डिजिटलची कामगिरी सरस ठरली आहे. भारतातील प्रथम क्रमांकाची न्यूज वेबसाइट ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ठरली आहे. त्या पाठोपाठ ‘इंडियन एक्सप्रेस’ आहे. पेजव्ह्यूजच्या बाबतीत ‘इंडियन एक्सप्रेस’ दुसऱ्या क्रमांकाची वेबसाइट असली तरी सर्वाधिक झपाट्याने वाढणारी वेबसाइट म्हणून या वेबसाइटची नोंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावर जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करण्यामध्ये तसेच त्यांना गुंतवून ठेवण्यामध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’ वेबसाइट जगात २३ व्या क्रमांकाची वेबसाइट ठरल्याचे ‘न्यूजव्हीप’ने म्हटले आहे. या यादीत समाविष्ट असलेली इंडियन एक्सप्रेस ही एकमेव न्यूज वेबसाइट आहे. तसेच ती एकमेव भारतीय वेबसाइट असल्याचे देखील न्यूजव्हीपने म्हटले आहे.

या यशाबद्दल बोलताना ‘इंडियन एक्सप्रेस’ डिजीटलचे सीईओ संदीप अमर म्हणाले, पत्रकारितेतील उच्च मूल्यांच्या परंपरेला आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. वाचकांची उच्च अभिरुची लक्षात घेऊन त्यांना महत्त्वपूर्ण बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. नव्या पिढीचे आणि तंत्रज्ञानाचे नाते अतूट असे आहे. तेव्हा नव्या माध्यमांचा प्रभावी वापर करुन उपयुक्त अशा बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतो आहोत. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’ डिजिटलच्या वाचकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. वाचकांच्या हिताचा विचार करुन सेवा दिल्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना संदीप अमर यांनी व्यक्त केली. इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या युनिक युजर्सची संख्या प्रती महिना साडे सात कोटी इतकी आहे. ‘कॉमस्कोअर’नुसार, ‘लोकसत्ता डॉट कॉम’ सातत्याने पहिल्या क्रमांकाचे न्यूज पोर्टल ठरले आहे. डेस्कटॉप आणि मोबाइल या दोन्ही ठिकाणी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने स्पर्धकांना मागे टाकले आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच हे यश मिळाल्याची भावना सीईओ संदीप अमर यांनी व्यक्त केली.

इंडियन एक्स्प्रेस डिजिटलबद्दल…

इंडियन एक्स्प्रेस डिजिटल ही देशातील वेगाने विकसित होणारी आघाडीची माध्यम क्षेत्रातील कंपनी आहे. विश्वासार्ह आणि उच्च मूल्य जपणाऱ्या बातम्या देण्यावर इंडियन एक्स्प्रेस डिजिटलचा विश्वास आहे. संशोधन करून तयार केलेल्या अचूक बातम्यांमुळे इंडियन एक्स्प्रेस डिजिटल देशातील वेगाने विकसित होणारी कंपनी ठरली आहे. सोशल मीडियावरही २.५ कोटी वाचकांना जोडून घेण्यात त्याचबरोबर १० कोटी वाचकांपर्यंत पोहोचण्यात कंपनीने यश मिळवले आहे.

http://www.indianexpress.com ही कंपनीची महत्त्वाची वेबसाईट असून, राजकारण, समाजकारण, क्रीडा, व्यापार, तंत्रज्ञान, मनोरंजन, लाईफस्टाईल या विषयांचे वार्तांकन या साईटच्या माध्यमातून केले जाते. indianexpress-loksatta.go-vip.net मराठी ऑनलाईन विश्वात निर्विवाद वर्चस्व गाजवणारी साईट आहे. http://www.financialexpress.com व्यापार आणि वित्तपुरवठा या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची साईट असून, http://www.jansatta.com सातत्याने प्रगती करत असून, हिंदीतील प्रमुख पाच वेबसाईटमध्ये जनसत्ता डॉट कॉमचा समावेश होतो. inuth.com ही काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आलेली साईटही ऑनलाईन विश्वास आणि सोशल मीडियामध्ये वेगाने प्रगती करते आहे.