भारतात Covid-19 ची लागण झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २०,९१७ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. मागच्या २४ तासात १,५५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मागच्या २४ तासात सोमवार सकाळपर्यंत देशभरात करोनाचे नवे ४,२१३ रुग्ण सापडले व ९७ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आता करोना व्हायरसचे ६७,१५२ रुग्ण असून २,२०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांमध्ये लक्षणे असतील तर त्यांना स्वत:हून समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.